#मिशन_बिगीन_अगेन - राज्यात कामगारांना पुन्हा रोजगार

Update: 2020-06-09 02:13 GMT

कोरोनामुळे संपुर्ण देशात शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी छोट्या उद्योगांसोबतच मोठे उद्योगांचे शटर सुद्धा डाऊन होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने एकेक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम रोजगारावर दिसून येत असून वर्धा जिल्ह्यातील सर्वच मोठे उद्योग सुरू झाले असून छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये सुमारे 15 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे जीवणावश्यक वस्तूंचे उद्योग वगळता सर्व उद्योगांना कुलूपबंद करावे लागले. यामध्ये राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमधील आणि इतरत्र असलेल्या उद्योगांचा समावेश होता. यामध्ये सॉफ्टवेअरच्या कंपन्यांनी त्यांच्या नोकरदारांना घरून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली. मात्र वस्तु उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना घरून काम करण्याची सोय करणे शक्य नसल्यामुळे अशा उद्योगांना शटर डाऊन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

जिल्ह्यात सुरू झालेल्या मोठ्या उद्योगांमध्ये उत्तम गलवा मेटॅलिक्स, उत्तम गलवा व्हॅल्यू स्टील, महालक्षमी, व्हील्स इंडिया मिलिटेड, गिमाटेक्स, पी व्ही टेक्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश असून सध्या या उद्योगांमध्ये सुमारे 9 हजार 625 कामगार कार्यरताम करत आहेत अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्देमवार यांनी दिली आहे.

याशिवाय जिल्ह्यात विविध छोटे उद्योग सुरू झाले असून त्यामध्ये सुद्धा 5 हजार कामगार काम करत आहेत.

जिल्ह्यात 95 टक्के उद्योग आणि कंपन्या सुरू झाल्या आहेत.

Similar News