कॅबिनेट मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Update: 2020-01-03 12:51 GMT

अमरावती - तिवसा मतदार संघाच्या आमदार आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर या मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्यात आल्या. त्यांनी आपल्या तिवसा मतदान संघातील शेंदूरजना बाजार येथे कपाशी आणि केळीच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला या वेळी देण्यात आले तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आलेल्या संकटाचा मुकाबला करा सरकार तुमच्या पाठीशी खम्बीर पणे उभे आहे असे मत या वेळी यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

काल तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या गारपिटीत खरीप हंगामासह रब्बी पिकांचही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी यशोमती ठाकुर यांनी थेट आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांच्यासोबत एसडीओ, तहसीलदारांसह अधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2904708679563773/?t=1

Similar News