विधानसभेसाठी MIM ला हव्या ८० जागा; वंचितचा जागा देण्यास नकार

Update: 2019-09-06 03:04 GMT

राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेत. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातही विधानसभेच्या जागापाटपावरुन चर्चा सुरू आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ८० जागांची मागणी केली आहे. मात्र, आंबेडकर यांनी एवढ्या जागा देण्यास नकार दिल्याचं कळतंय.

जागावाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी गुरूवारी वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीसाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी हैद्राबादहून प्रतिनिधी पाठवला होता. या बैठकीला अॅड. प्रकाश आंबेडकर, औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल, डॉ. अब्दुल गफार कादरी, सुजात आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.

Similar News