Milind Deora : शिंदेंच्या गळाला लागला बडा मासा

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई तिकीट मिळणार याची खात्री पटल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ५५ वर्षांचे काँग्रेसोबत असलेले देवरा कुटुंबियांचे नाते अशाप्रकारे संपुष्ठात आले आहे.

Update: 2024-01-14 10:10 GMT

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईचं तिकीट मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ५५ वर्षांचे काँग्रेसोबत असलेले देवरा कुटुंबियांचे नाते अशाप्रकारे संपुष्टात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहून चुकलेले आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यामुळे काँग्रेसला केंद्रीय स्तरावर आणि मुंबईत सुद्धा जोरदार धक्का बसला आहे. यापुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन काम करणार आहे. देवरा यांच्या जाण्यानं मुंबई काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याच कारण म्हणजे दक्षिण मुंबईत देवरा कुटुंबीयांचं असलेलं वर्चस्व. आज हे गतकाळातलं वर्चस्व तसच टिकून नसलं तरी ते शिल्लक नाही असं कुनीही म्हणू शकणार नाही. देवरा कुटुंबियांसाठी इतके दिवस काम करणारे आणि एकनिष्ठ असलेले काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मिलिंद देवरा यांच्यासोबत जातील. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या काँग्रेससमोर देवरा यांच्या राजीनाम्यामुळे संकट निर्माण झालं आहे. आणि पर्यायाने हे नुकसान महाविकास आघाडीला सुद्धा जास्त झालं आहे.

उद्धव ठाकरे यांना तगडं आव्हान


उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार आहेत अरविंद सावंत. सावंत हे २०१४ पासून खासदार आहेत. आणि पुन्हा त्यांनाच एकदा २०२४ मध्ये तिकीट दिलं जाणार याची पुरेपूर खात्री देवरा यांना झाल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचं पक्क केलं.गेल्या काही दिवसांपासून देवरा गटात धुसपूस सुरु होती. याच कारण म्हणजे दक्षिण मुंबईत खासदार पद भूषवलेल्या देवरा यांना उद्धव ठाकरे गटामुळे तिकीट मिळणार नाही याउलट प्रदेश काँग्रेससुद्धा त्यांच्या तिकिटासाठी काहीच प्रयत्न करत नसल्याची त्यांची माहिती होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार दक्षिण मुंबई जागेसंदर्भात वक्तव करत होते. आणि दक्षिण मुंबई जागेबद्दल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अरविंद सावंतांच्या नावाची घोषणा जागावाटप झाले नसताना करून गेले. त्यामुळे देवरा यांचे कारकर्ते सुद्धा त्यांना कायम विचारात होते कि 'तिकीट आपल्याला मिळणार आहे की नाही" पण देवरा यांनी मात्र त्यांना जागावाटप होईपर्यंत शांत बसायला सांगत होते.यादरम्यान योग्य पक्षाची चाचपणी मिलिंद देवरा यांच्याकडून होतच होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते विकासकामासाठी २०२२ मध्ये भेटून गेले होते. त्यानन्तरही त्यांच्या भेटीची चर्चा झाली होती. मात्र देवरा यांनी राजकीय कारण भेटीमागे नसल्याचं स्पष्ट करत राहिले. तरीही त्यांच्या काँग्रेसबद्दल नाराजीची चर्चा मात्र काही थांबली नाही. मधल्या काळात अजित दादा गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांची भेट त्यांनी घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीत देवरा जाणार असल्याची चर्चा झाली ती सुद्धा त्यांनी फेटाळून लावली. आता शिंदेचा हात देवरा यांनी धरल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मोठी टक्कर मिळणार आहे. पर्यायाने अरविंद सावंत यांच्यासमोर भाजपच्या मदतीने देवरा मोठं आव्हान तयार करणार आहेत.


मिलिंद देवरा यांची ताकद काय ?


मुरली देवरा दक्षिण मुंबईचे अनेकवेळा खासदार होते.पेट्रोलियम मंत्री सुद्धा होते. गांधी कुटूंबीयांशी त्याची जवळिक होती. पक्षाला निधी मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. अंबानी सारख्या बड्या व्यावसायिक घराण्यांशी सुद्धा त्यांचे कौटूंबिक संबंध होते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा सर्वधर्मीय मतदार होता. हाच वडिलांचा वारसा मिलिंद देवरा यांना सुद्धा लाभला.त्यातून ते खासदार झाले,मंत्री झाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. राहुल गांधींशी त्यांची मैत्री वाढली. काँग्रेसचा मतदार हा त्यांच्या कायम पाठीशी राहिला.याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. अर्थात २०१४ पासून अरविंद सावंत जिंकून येत असल्यामुळे देवरा मागे पडले. आणि महाविकास आघाडीच्या काळात त्यांची ताकद कमी झाली. मुंबई काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी असल्यामुले काँग्रेसचे नेतेही एकदिलाने कधी एकत्र आले नाही. वाद आणि मतभेत वाढत गेले आणि काँग्रेसची शक्ती सुद्धा क्षीण झाली. देवरा यांच्या नावाची चर्चाही थांबली. तरीसुद्धा देवरा यांचं नेतृत्व मानणारे काही कार्यकर्ते आणि नेते त्यांच्यासोबत कायम राहिले. याकाळात देवरा जनतेशी फार काही कनेक्ट राहिले असे नाही. मात्र तरीही त्यांची ताकद अजिबात नाही असे अजिबात नाही. निवडणुकीच्या काळात ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे कार्यकरते आणखी सक्रिय होतांना आपल्याला दिसून येतील.

राहुल गांधी आणि मिलिंद देवरा यांची मैत्री इतिहासजमा


डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान सरकारमध्ये २००९ साली राहुल गांधींचे तीन मित्र मंत्री झाले. सचिन पायलट,जोतिरादित्य सिंदिया आणि मिलिंद देवरा. त्यातले सिंदिया मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या बाजूने गांधी कुटुंबीय राहिल्यामुळे भाजपमध्ये गेले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना झुकते माप दिल्याने सचिन पायलट यांची नाराजी अजून संपलेली नाही. आणि देवरा यांनी काँग्रेसशी मतभेत झाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच देवरा यांनी त्यांना सलामी दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जयराम रमेश यांच्याशी १२ जानेवारी रोजी मोबाईलवर संपर्क साधून राहुल गांधींशी तिकीट वाटपावर चर्चा करण्याची इच्छा असल्याचं देवरा यांनी सांगितलं. भेट घडवून आणण्याचं आश्वासन रमेश यांनी देवरा यांना दिलं. मात्र याच दरम्यान त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. हा सर्व खुलासा रमेश यांनी स्वता केला आहे. राहुल गांधींशी भेट झाली असती तरी सुद्धा जागावाटपात फार काही बदल झाला असता असे नाही. याची जाणीव देवरा यांना सुद्धा असावी. त्याचमुळे सत्तेसाठी अंडी खासदारकीच्या तिकिटाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून देवरा यांनी भेटीअगोदरच रविवारी बॉंबस्फोट केला. राहुल गांधी पूर्वीच्या आपल्या मित्राला म्हणजे देवरा यांना ताबडतोब भेटू शकले असते. पण ते का भेटले नाही याचे कारण म्हणजे त्यांची मैत्रीत देवरा यांना पक्षाचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष दिल्यानंतर सुद्धा कायम राहिली नव्हती. या मैत्रीत कधीच दुरावा आला होता. देवरा यांना काँग्रेसने वाऱ्यावर सोडून दिले याची जाणीव देवरा यांना झाली असावी. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. रमेश म्हणाले की ,राहुल गांधींच्या भारत जोडोच्या बातम्यांच्या हेडलाईन्सवरून माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने रचलेले हे षडयंत्र आहे,म्हणजेच देवरा यांना भाजपने शिवसेनेत धाडले आहे. काहीही असो आरोप-प्रत्यारोप आता होताहेत, होत राहणार. मात्र काँग्रेसचा एक बडा नेता जो अंबानी यांच्या जवळचा आहे, काँग्रेसपासून दूर गेला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला अजिबात होणार नाहीये. उलट महाविकास आघाडीला त्याचा फटका बसणार आहे याची जाणीव काँग्रेस आणि मविआला सुद्धा आहे. अशी जाणीव असून देखील ते असे का करतात याचे कोडे मात्र आपल्याला पडलं आहे

Tags:    

Similar News