मी असा जगलो" या आत्मचरित्र पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल: मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जन्माला येऊन स्वकर्तृत्वावर यशस्वी होणे आणि समाजाप्रती बांधिलकी कृतीतून सिद्ध करणं असं, अलौकीक काम डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.;

Update: 2021-05-17 08:56 GMT

"मी असा जगलो" या आत्मचरित्र च्या उत्तराधर्याचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,जागतिक कीर्तिचे भाषातज्ञ्ज्ञ आणि राष्ट्रीय सेवा दलाचे‌

अध्यक्ष प्रा. गणेश देवी,माजी कुलगुरु आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते.देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी धोरणावरून मतभेद असतानाही त्यांच्या सोबत काम करून नियोजन आयोगामध्ये अनमोल योगदान दिल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मी असा जगलो वाचल्यानंतर मुणगेकर यांच्या अलौकिक जीवनाची अनुभूती मिळते अशा शब्दात प्रा. गणेश देवी यांनी यावेळी गौरव केला. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी संदेश पाठवून मुणगेकर यांना शुभेच्छा देत कोकणातील एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या म्हणजे मुणगेकरांनी सामाजिक विषमतेशी संघर्ष करत शिक्षणाची कास धरून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी उंची गाठली नव्या पिढीसाठी हे आत्मचरित्र प्रेरक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.लोकवांगमय गृहचे राजन बावडेकर यांनी आभार व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News