शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बैठक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Update: 2019-11-04 07:29 GMT

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा दिवसागणिक वाढत असल्यामुळे सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी चालु आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना, "येत्या काही दिवसात महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट होईल." म्हटलं होत. आज देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यात नवी दिल्ली येथे बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागुन होत, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बैठक घेतल्याचं माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं. स्वत: अमित शहा विमा कंपन्याशी बोलतील त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडुन जास्तीत जास्त मदत दिली जाईल. असं आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर सरकार लवकरच स्थापन होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Similar News