नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यात दिल्लीत बैठक

Update: 2019-11-06 05:23 GMT

राज्यातल्या सत्तास्थापनेसाठी वेगवान घडामोडी घडत आहेत. मुंबईसोबत दिल्लीतही खलबतं सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

अहमद पटेल हे काँग्रेसचे थिंक टँक मानले जातात. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या भेटीतून काय नवीन समीकरण समोर येतं हे बघणं महत्वाचं आहे.

मात्र, ही भेट राजकीय नसून गुजरातमधल्या रस्त्यांच्या कामासंदर्भात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलीय.

Similar News