Max Impact: शेतकऱ्यांना मिळाली धान्य विक्रीची थकीत रक्कम

Update: 2019-12-24 02:30 GMT

भंडारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे तब्बल 52 कोटी रुपये थकवण्यात आले होते. विक्रीनंतर केवळ सात दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात एक महिन्यानंतरही शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली होती.

यासंदर्भात ‘मॅक्समहाराष्ट’ने 'शेतकऱ्यांच्या धानाचे कोट्यावधी रुपये थकले, महिन्यानंतरही हवालदिल शेतकरी पाहतोय पैशाची वाट...' या आशयाचं वृत्त १३ डिसेंबर रोजी प्रसारित केलं होत. या वृत्ताची तात्काळ दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांनी थकीत पैसे त्यांच्या बॅंक खात्यांवर देण्यास सुरुवात केली आहे. या संबंधित शेतकरी ओमप्रकाश बोंदरे यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’ने बातमी लावल्य़ामुळे धानाची थकीत रक्क्म मिळण्यास सुरुवात झाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Full View

Similar News