विलेपार्ले येथील प्राईम मॉलला भीषण आग ; दोन जण होरपळले

Update: 2021-11-19 13:03 GMT

मुंबई : विलेपार्ले येथील प्राईम मॉलला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. तब्बल पाच तासानंतर या आग आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत दोनजण होरपळले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले येथील सोसायटी रोडवरील इर्ला येथे प्राईम मॉलला भीषण आग लागली. तळमजल्यासह तीन मजली इमारतीला लागलेली ही आग अत्यंत भीषण होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुब्बसीर मोहम्मद असं या जखमी तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तर आग विझवण्याचं काम करत असताना अग्निशमन दलाचे जवान मंगेश दिनकर गांवकर हे देखील जखमी झालेत. त्यांना किरकोळ मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं.

Tags:    

Similar News