राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची

Update: 2020-02-26 10:43 GMT

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली आहे. गुरूवारी यासंदर्भातलं विधेयक विधानसभेत मांडलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितले.

तर याच चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचं कामकाज संपूर्णपणे मराठीत चालण्यासाठी सरकारनं कायदा करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला इतर बोर्डाच्या शाळांची मनमानी, त्यांची अवाजवी फी याबद्दल सरकार कायदा करणार का असा सवालही शिक्षणमंत्र्यांना विचारला.

Similar News