मराठा आरक्षण : दुसऱ्याचे आरक्षण काढून नव्हे स्वतंत्र आरक्षण द्या – उदयनराजे भोसले

Update: 2021-01-28 10:00 GMT

मराठा समाजाला कुणाचे आरक्षण काढून आरक्षण नको तर स्वतंत्र आणि हक्काचे आरक्षण हवे आहे, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. आमदार अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या साताऱ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. उद्या तुमची मुलं जाब विचारतील तेव्हा त्यांना काय उत्तर देणार, असा सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. लोकांनी मोर्चे काढले, जीव दिले तरीही त्यांच्या भावना समजून घेणार नसाल तर काय बोलावे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर राजकारण कऱण्यापेक्षा आरक्षण कसे मिळेल याचा विचार लोकप्रतिनिधींनी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


Full View
Tags:    

Similar News