आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी

Update: 2020-09-28 10:32 GMT

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर ठीक-ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनही केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र आता आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकारण गेलं चुलीत म्हणत ,जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आमच्या गावात येऊ नये. आशा आशयाचे बॅनर पैठण तालुक्यातील काही गावात लावण्यात आले आहेत. औरंगाबाद पैठण रोडवरील ढोरकीन फाट्यावर ही असाच एक बॅनर लावण्यात आले आहे .'चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष' असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा कडून करण्यात येत आहे.मात्र त्याला अनेक राजकीय पक्ष प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत आता राजकीय नेत्यांनाच गावात प्रवेश न देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Similar News