मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली; छातीत कळा येत असल्याने अंतरवालीत डॉक्टरांची टीम दाखल

Update: 2024-03-02 07:15 GMT

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली; छातीत कळा येत असल्याने अंतरावलीत डॉक्टरांची टीम दाखल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत शुक्रवारी रात्री अचानक बिघाड झाली असून त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले व त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातय.

रात्री १० वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी आंतरवालीतच त्यांच्यावर उपचार केले. ऍसीडीटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याठिकाणी शुक्रवारी (१ मार्च, २०२४) रोजी मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी अंतरावली सराटी तेथे आले होते. यावेळी त्यांनी दिवसभर नागरीकांसोबत संवाद साधला. 

Tags:    

Similar News