कोरोनाशी लढा – रस्त्यावर थुंकताय….खबरदार....

Update: 2020-04-11 00:47 GMT

कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी सरकारने शक्य ते सर्व केले आहे . नागरिकांनीही सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आवाहन करण्यात येते आहे. पण काही महाभाग अजूनही अगदी साध्या साध्या गोष्टींचे पालन करत नसल्याचं दिसत आहे.

अशाचप्रकारे रस्त्यावर थुंकणाऱ्या एका तरुणाला तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. सुरूरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका दुधाच्या गाडीचा चालक चंपापेठ चेक पोस्टजवळ रस्त्यावर थुंकताना आढळून आला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई कऱण्यात आली असताना हा तरुण रस्त्यावर थुंकल्याने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Similar News