ममता बॅनर्जी यांची CAB विरोधात मेगा रॅली

Update: 2019-12-16 06:43 GMT

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (CAB)पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर अकांऊटवरुन ही माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर लिहिलं की, “आंदोलनाची सुरुवात ही एक वाजता बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याजवळ होईल आणि जोरासंको ठाकूरबारी इथे समारोप होईल. समाजातल्या प्रत्येकानं यावं अन ह्या आंदोलनासाठी सहकार्य करावं, या आंदोलनमध्ये सहभागी व्हावं.” असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

गव्हर्नर जगदीप धनकर यांनी ममता बॅनर्जींच्या या रॅली बद्दल असहमती दर्शवली आहे. त्यांनी ट्विटरवर असं लिहिलं आहे की, “मुख्यमंत्री आणि मंत्री सीएए (CAA) विरूद्ध मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत याचा मला अत्यंत क्लेश आहे. हे असंवैधानिक आहे. मी मुख्यमंत्र्यांना यावेळेस या घटनात्मक आणि दाहक कृत्यापासून दूर राहण्याची आणि भयानक परिस्थिती निर्माण न करण्याचं आवाहन करतो."

 

 

Similar News