पावसाच्या पाण्याने शेती गेली खरडून ; पिकाचे मोठे नुकसान

Update: 2021-09-28 15:39 GMT

मागील दोन दिवसांपासून वर्धा शहरासह हिंगणी तालुक्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाल्याची घटना समोर आली आहे.

सततच्या पावसामुळे तब्बल दीड एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगणी येथील शेतकरी विजय टेकाटे यांच्या शेतातील अंकुरलेले पीक नाल्याच्या पुरामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने शेत जमीनीचा सुपीक थर पाण्यासोबत वाहून गेला आहे. खरडून गेलेल्या शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आधीच पिकाचे नुकसान झाले आहे त्यातच जमीन खरडून गेल्याने दीर्घकाळासाठी याचा परिणाम होणार असल्याने शासनाने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी विजय टेकाटे यांनी केली आहे.

Tags:    

Similar News