माहुल प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी? न्यायासाठी माहुलवासी आता ठाकरे सरकारच्या दारी

Update: 2019-12-11 07:05 GMT

नवीन सरकारकङून सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक वर्षापासून असलेल्या समस्या उद्धव ठाकरे यांचे सरकार दूर करेल. या आशेने लोक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात भेट घेऊन समस्या मांडत आहे.

याच आशेनं माहुल प्रकल्पग्रस्तांनी आता शिवसेनाभवनकङे धाव घेतली आहे. यावेळी माहुल वासियांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा देत आमचं माहुलमधून स्थलांतर करा. अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा

गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करा अशी विनंती माहुल वासियांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रकल्पग्रस्त वसाहत आणि माहुल गावात प्रदूषणाने दीडशेहून अधिक बळी गेले आहेत. ८०० हून अधिक लोकांना दूर्धर आजाराने ग्रासले आहे. मृतांचा आकडा दरदिवशी वाढतच चालला आहे. माहुलमध्ये मरण स्वस्त झालं आहे का? असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे.

वसाहतीतील प्रत्येक घरात आजाराने घर केलं आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने माहुल वासियांच्या समस्या वेळोवेळी मांडल्या आहे.

येथील नागरिक त्वचारोगानं ग्रस्त आहेत. प्रदूषित पाणी पिल्यानं उलट्या-जुलाबाचा त्रास होत आहे. कुणाच्या घरात कॅन्सरचा रुग्ण आहे तर कुणाच्या घरात टीबीनं ठाण मांडलंय. डोक्यावरचे केस गळू लागले आहेत. किडनीचे विकार वाढले आहेत. अनेकांची फुफ्फुसं निकामी झाली आहेत. अनेक बाळं या जगात येण्याआधीच गर्भात दगावली असल्याचं इथले नागरिक सांगतात.

कुणाच्या कुटुंबाचा आधार तुटलाय तर कुणाला एकुलतं एक मूल गमवावं लागलंय. या जीवघेण्या वेदना नवीन सत्तेत आलेलं सरकार नक्की सोडून न्याय देईल. हा विश्वास माहुलवासियांना आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे येणार महत्वाचं ठरणार.

Similar News