कोरोना निर्बंधांचे नियम बदलले, 5 ऐवजी आता 3 टप्पे

Update: 2021-06-25 12:04 GMT

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर सरकारने 5 टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेक व्यवहार सुरु झाले, लोक बाहेर पडू लागले. पण गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या काहीशी वाढली आहे. तसेच कोरोनाच्या Delta Plus Variant चेही 21 रुग्ण राज्यात आढळल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारऩे आधी जारी केलेल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याप्रमाणे आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या टप्प्याच्या वरच ठेवण्यात येणार आहे.

याआधीच्या नियमांनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यात त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेचे प्रमाण याच्या आकडेवारीनुसार कमी दर असलेले जिल्हे पहिल्या गटात असतील तर दर आणि बेड व्याप्तता जेवढी जास्त तसा तो जिल्हा किंवा महापालिका पुढील 2 ते 5 गटात असेल.

पण आता सरकारच्या नवीन आदेशानुसार पॉझिटिव्हिटी रेट किंवा किती ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. या आकडेवारी नुसार वर्गवारी न करता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या गटाच्या वरच असतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्बंधांमध्ये बदल करण्यासाठी RT-PCR रिपोर्ट आवश्यक

स्थानिक प्रशासनाला कोरोनाचे निर्बंध कमी जास्त करायेच असतील तर फक्त RT-PCR चाचण्यांच्या निष्कर्षांच्या आकडेवारीवरुन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निर्बंध कसे कमी होणार?

याआधीच्या नियमांनुसार गुरुवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड उपलब्धतेचा आढावा घेऊन निर्बंधांचा निर्णय व्हायचा. पण आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग २ आठवड्यांमधील आकडेवारीच्या आधारे निर्णय घेणार आहे. पण निर्बंध वाढवण्यासाठी 2 आठवड्यांच्या आकडेवारीचे गरज नसेल असेही स्पष्ट कऱण्यात आले आहेत.

त्याचबरोबर कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना दंड, RTPCR चाचण्या वाढवणे यासारख्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.



 




 



 



Tags:    

Similar News