महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच लवकर सुटेल -पृथ्वीराज चव्हाण

Update: 2019-11-20 16:56 GMT

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार आणि कोण विरोधी बाकावर बसणार यावर अजून पुर्णविराम लागलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत मागील २२ दिवसांपासून मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होईल असं वक्तव्य सातत्याने करत आहेत. मागील काही दिवसांपासुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सत्तास्थापने संर्दभात चर्चा चालु होती. पंरतु त्यांनी देखील यावर अजून मार्ग काढलेला नाही.

महाराष्ट्रात लवकरच एक स्थिर सरकार स्थापन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवस काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चर्चा झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात येईल असं मत माध्यमांशी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलयं.

“महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू झाल्यापासून राज्यातील बरीच महत्वाची कामे अजून प्रंलबीत आहेत. शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळालेली नाही, त्यामुळे राज्यात नवीन सरकार प्रस्थापित व्हावी अशी संपुर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे”. असही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलय.

Similar News