ऐन थंडीत पावसाचे विघ्न...

Update: 2023-01-30 08:46 GMT




रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत राज्यभरात ढगाळ वातावरणाची नोंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन थंडीत पावासाचे विघ्न राज्यावर ओढवणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण रविवारी पाहायला मिळाले.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान पुन्हा एकदा १५ अंशावर आल्याची नोंद करण्यात आली आहे. नंदूरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात यामुळे गारवा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस सौम्य थंडी जाणवण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक, कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News