‘शिवभोजन’ योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा – अजित पवार

Update: 2020-01-26 09:09 GMT

शिवसेनेची ‘शिवथाळी’ म्हणजेच शिवभोजन (shivbhojan) योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून सुरुवात करण्यात आली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली शिवभोजनाची थाळी लाभार्थीला दिली. यावेळी अजित पवार यांनी ज्यांची ऐपत आहे त्यांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेऊ नये असं आश्वासन नागरिकांना केलं आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईमध्ये तर अजित पवार यांनी पुण्यामध्ये शिवभोजनाचे उद्घाटन केलं आहे. थाळीमध्ये भात, दाळ, भाजी, लोणचे, दोन पोळ्या होत्या. शिवभोजना मागचा उद्देश एवढाच की, गरिबांना पोटभर जेवण मिळावे.

आदित्य ठाकरे यांनी मूंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयात आहार असलेल्या ‘शिवभोजन’ या योजनेचे उद्घाटन केलं आहे. त्याचप्रमाणे पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचं उदीष्ट आहे. असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन स्पष्ट केलं.

Similar News