Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस

Update: 2023-07-24 02:14 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच आता आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज विविध जिल्हात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट, लावण्यात आला आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज पुण्यात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई आणि ठाण्यातही 'यलो अलर्ट' असून इथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आज 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

Tags:    

Similar News