सोशल मीडियावर लिहितांना जरा जपून...

Update: 2020-06-21 01:58 GMT

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 491 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 260 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप- 195गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – 201 गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- 26 गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 56 गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 260 आरोपींना अटक.

■ 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटवल्या

Similar News