राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलीन

Update: 2019-10-11 05:09 GMT

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळून राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.

आमदार नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यावेळी नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला होता. या अगोदर विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा देखील शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पराभव केला होता.

Similar News