Maharashtra MLC Polls: मोदींना शिव्या घालणाऱ्यांना संधी: एकनाथ खडसे

Update: 2020-05-08 10:43 GMT

आज भाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट करत.

भाजपने वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली आहे. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना देखील संधी दिली आहे. मात्र, या यादीवर ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

42 वर्ष एकनिष्ठ पणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. आणि अनेक चढ उतार मी पाहिलेले आहेत. आणि कठीण परिस्थितीत काम करत असताना पक्षाला उभारणी देण्यासाठी काम केलं आहे. वर्षानुवर्ष काम करत असताना आमची अपेक्षा होती की, यावेळेला संधी मिळावी.

हे ही वाचा...


ऑनलाईन मद्यविक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना विचारणा

Maharashtra MLC Polls: निष्ठावंतांचा पत्ता कट! मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे यांना तिकिट नाहीच…

राज्यातील ५२२८ कोरोना रुग्ण लक्षणं विरहित, राज्यात रुग्णांची संख्या 17 हजार 947

पण दुर्दैवाने या ठिकाणी संधी मिळू शकलेली नाही. पण नवीन ज्या माणसांना संधी दिली आहे. त्यांचा विचार करता... किमान काही वर्ष पक्षाचे काम केलेले आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. अशा लोकांना संधी मिळाली असती तर मला आनंद वाटला असता.

पण ज्याने अक्षरश: शिव्या घातल्या, ‘मोदी गो बॅक’ अशा घोषणा होत्या... पडळकर यांच्या. अशा लोकांना संधी दिली गेली. राष्ट्रवादी मध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना संधी दिली गेली. त्यामुळं भारतीय जनता कोणत्या दिशेनं चाललेली आहे. याचं चिंतन करण्याची गरज आहे.

Similar News