काँग्रेसकडून मोदी उमेदवार

Update: 2020-05-10 02:21 GMT

राज्यात येत्या 21 मे ला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. शिवसेना सोडता सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. कॉंग्रेस ने ही आपले दोन उमेदवार घोषित केले आहेत. कॉंग्रेस ने राजेश धोंडीराम राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

राजेश राठोड हे प्रदेश काँग्रेसचे सचिव असून काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा म्हणून ओळखले जातात. तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. दरम्यान भाजपने राज्यातील विधान परिषदेच्या चार जागा घोषित केल्या आहेत. भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे.

हे ही वाचा…


…अखेर शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

ठाकरे सरकारचं प्रशासन कुचकामी ? माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

पडळकर इन, जानकर आऊट?

वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना ट्विट…

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ने अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे ह्याच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार असतील हे निश्चित मानलं जात आहे.

त्यामुळं 9 जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. हे स्पष्ट झालं आहे.

Similar News