Top
Home > Max Political > ...अखेर शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

...अखेर शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

...अखेर शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन
X

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील मजुरांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कालच औरंगाबाद येथे रेल्वेखाली 16 मजुरांचा मृत्यू झाला. यामुळं देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. तसंच शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.

ज्या मजुरांना त्यांच्या मायदेशी परत जायचे आहे. त्यांच्या वाहतुकीसाठी आडमुठेपणाचे धोरण ठेवणार नसल्याचे शिवाय राज्य परिवहन बसेस मजूर व प्रवासी यांच्या प्रवासासाठी वापरल्या जातील. असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

याशिवाय केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही त्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याच्या व्यवस्थेचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रवासी आणि मजुरांच्या या प्रश्नात लक्ष घालून त्यांना स्वीकारण्यास भाग पाडावे. अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.

Updated : 9 May 2020 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top