३ महिने घरभाडे वसुली नको; राज्य सरकारच्या घरमालकांना सूचना

Update: 2020-04-17 13:41 GMT

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार आहे. याकाळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विभागाने कोविड-१९ साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घरमालकांना घरभाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. तसेच या कालावधीत घरभाडे न भरल्यास किंवा घरभाडे थकल्याने कोणालाही कोणालाही घराबाहेर काढू नये असं सरकारकडून सांगण्यात आलंय. राज्यभरातील भाडेकरूंसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

लॉकडाऊन काळात सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने, सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर परिणाम झाला असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे या सूचना केल्या असल्याचं सांगण्यात आलंय.

Similar News