राज्यातील उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा

Update: 2020-04-16 14:33 GMT

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असले तरी राज्य सरकारने आता उद्योग क्षेत्रासाठी मोठा निर्णय़ घेतला आहे. राज्यातील रेड झोनमधील 12 महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागात परिस्थितीनुसार उद्योग-व्यापार 20 एप्रिलपासून सुरू करण्याची तयारी राज्याच्या उद्योग विभागाने सुरू केल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमधील परिस्थिती आटोक्यात आहे, त्यामुळे तिथले उद्योग-व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पण या जिल्ह्यांच्या सीमा बंद राहतील, कच्चा माल येऊ देण्याची आणि उत्पादनं बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. त्याचबरोबर कच्चा माल आणि उत्पादनांची वाहतूक करणाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे असंही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

या अटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी उद्योगाच्या ठिकाणीच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी लागणार

काम करताना हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार लघु उदयोगांनी MIDC मध्ये एकत्र येऊन कामगारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याची तयारी दाखवली तर MIDC तर्फे मदतीचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

दरम्यान रेड झोनमधील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, भिवंडी, नागपूर, कल्याण-डोंबिवली या भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे उद्योगांना परवानगी देणयात येणार नाहीये. पण या व्यतीरिक्त इतर भागात परिस्थितीप्रमाणे आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून प्रस्ताव तयार कऱण्याचं काम सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितेल. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली की २० तारखेच्या आसपास उद्योग सुरू होऊ शकतील अशी माहितीही त्यांनी दिली. या निर्णय़ामुळे रोजगार गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळणार आहे. शेतीआधारीत उद्योगांना प्राधान्य देणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

Similar News