शाळांच्या फी बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Update: 2020-05-09 01:40 GMT

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्वच शाळांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने आधीच घेतला होता. पण नवीन शैक्षणिक वर्षात मुलांच्या शाळेची फी कशी भरायची या चिंतेतही लाखो पालक आहेत. या सगळ्यांना राज्य सरकारने आता दिलासा दिला आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ करू नये असे आदेश सरकारने काढले आहेत. त्याचबरोबर २०१९-२० किंवा २०२०-२१ या वर्षातील फी पालकांना एकदम भरणे शक्य होणार नसेल तर त्यांना शिल्लक असलेली फी एकदाच न भरता दर महिन्याला किंवा तिमाही स्वरुपात भरण्यास परवानगी द्यावी असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा...


पुणे जिल्ह्यात कोरानमुक्त रुग्णांची संख्या ८२७

कबाल चहल यांनी स्वीकारली मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं

त्याचबरोबर पालकांना Online फी भरण्याचा पर्यायही उपलब्ध करुन द्यावा असंही शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमध्ये सांगण्यात आले आहे. सरकारचा हा आदेश राज्यातील सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ पर्यंतच्या शाळांसाठी लागू आहे.

Similar News