पुणे जिल्ह्यात कोरानमुक्त रुग्णांची संख्या ८२७

मुंबईनंतर राज्यभरात पुणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत आणि त्यातही सर्वाधिक रुग्ण हे एकट्या पुणे शहरात आहेत. जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे नवीन 111 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २ हजार ५७२ वर पोहोचली आहे.

यातील तब्बल २ हजार २४७ रुग्ण हे पुणे शहरात आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. पण या सर्व गंभीर परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ८२७ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ७३२ रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 159वर पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात आढळलेले नवीन रुग्ण

पुणे शहर – ९२
पिंपरी चिंचवड शहर – 05
काँटोन्मेंन्ट आणि नगरपालिका क्षेत्र- 05
पुणे ग्रामीण – 09

हे ही वाचा…कबाल चहल यांनी स्वीकारली मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं

पुणे ग्रामीणमधील एकूण रुग्ण – 57

हवेली- 37
जुन्नर- 1
शिरूर- 3
मुळशी- 1
भोर- 4
वेल्हा- 8
बारामती- 1
इंदापूर- 1
दौड- 1

काँटोन्मेंट आणि नगरपालिका – 109

बारामती – 7
दौंड नगरपालिका – 9
पुणे काँटोन्मेंन्ट- 70
खडकी काँटोन्मेंन्ट – 21
देहूरोड काँटोन्मेंन्ट – 2

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या – 143

पुणे शहर – 128
पिंपरी चिंचवड – 06
पुणे ग्रामीण – 09