पाकिस्तानातून कांदा आयात करण्यासाठी सरकारकडून निविदा

Update: 2019-09-13 04:54 GMT

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (MMTC) पाकिस्तानातून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदाही काढण्यात आली आहे. या निर्णयामुळे वादाला तोंड फुटण्याती शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचं अपेक्षित उत्पादन झालेलं नाही त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात भाव आणखी वाढू नये यासाठी बाजापेठेत मुबलक कांदा उपलब्ध असणं आवश्यक आहे म्हणून एमएमटीसीने पाकिस्तानसह इजिप्त आणि अफगाणिस्तानातून २ हजार टन कांदा आयात करण्यासाठीची निविदा काढली आहे.

मात्र, दिवाळीनंतर खरीप हंगामातील पिकांची कापणी होणार आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये मुबलक कांदा उपलब्ध होणार असताना पाकिस्तानसारख्या देशातून आयात करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय.

Similar News