बॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

Update: 2020-05-29 11:43 GMT

बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सरकार ने घेतला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार

आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार

इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार

इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल

Similar News