राजकीय कोंडी लीलावतीत सुटणार?

Update: 2019-11-12 08:26 GMT

महाराष्ट्रात राजकीय पेच पडला असताना, गेल्या 15 दिवसांपासून शिवसेनेचा एकहाती किल्ला लढवणारे संजय राऊत (sanjay raut) यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्या (13 नोव्हेंबर) ला संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना त्यांच काम आजही सुरुच ठेवलं आहे.

मात्र, याच वेळी लीलावती रुग्णालयात (lilavati hospital) राजकीय हालचालींनाही वेग येतोय. काँग्रेसचे,(congress) भाजप,(bjp) राष्ट्रवादीचे नेते संजय राऊत यांना भेटण्यास येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय कोंडी लिलावतीत सुटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये जो विसंवाद होता. तो रुग्णालयातील एकमेकांच्या भेटीमुळे सुटण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? या विषयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने काढलेला वेळ म्हणजेच शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचं जाणकारांचे म्हणणं आहे. शरद पवार (shard pawar) आणि उद्धव ठाकरे (uddhav thakary) यांची भेट झालेली असतानाही काँग्रेसकडून जे पत्र आलं त्यात शिवसेनेचा उल्लेख नसणं ही एक मोठी राजकीय खेळी असल्याचं सांगितलं जातं आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची बैठक होणार असून शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? यावर निर्णय होणार आहे. खरंतर सोनिया गांधी यांच्यासमोर तब्बल 40 काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त केलं होतं. पण दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना आणखी एका चर्चेत अडकवल्यामुळे शिवसेना पाठिंबा द्यायचा हा निर्णय राखून ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा करून नंतरच निर्णय घेऊ असं निश्चित करण्यात आलं.

हे ही वाचा :

सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? दिल्लीतले काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने

संजय राऊत यांच्यावरील अँजियोप्लास्टी यशस्वी, उद्या मिळू शकतो डिस्चार्ज

‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ब्लेम गेम सुरु’

सत्तास्थापनेसाठी दिलेली मुदत संपल्याने शिवसेना तोंडघशी पडली आहे. त्यात वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी नकार दिला आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची पुन्हा बैठक होणार असून या बैठकीनंतर संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे नेते लीलावती रुग्णालयात दाखल होण्याची शक्‍यता आहे. आणि हिच शिवसेना भाजपमधील विसंवाद पुन्हा सुरू होण्याची चिन्हं वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याचबरोबर भाजप चे नेते देखील सध्या लीलावती रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळं या ठिकाणी सत्तेची खलबत होण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. ते कितपत यशस्वी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार त्याचबरोबर लिलावती रुग्णालयात सर्वच राजकीय पक्षाचे नेते आल्यानं महाराष्ट्रातील राजकीय कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

Similar News