#CoronaVaccine महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी डोस- राजेश टोपे

Update: 2021-01-13 08:45 GMT

मुंबई: महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीचे अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लस लगेच सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आले असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

लस सध्या कुणाला दिली जाणार नाही

१८ वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही जणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो.

लस दिल्यानंतर काय त्रास जाणवू शकतो?

लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काही जणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारकडून सध्या महाराष्ट्राला केवळ ९ लाख ६३ हजार लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या २० हजार कुप्यांचा समावेश असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News