तुळजापुर मतदारसंघ विधानसभा लढत

Update: 2019-10-19 17:31 GMT

महाराष्ट्राच्या निवडणुकीत ५५ वर्षांत तुळजापुरातुन धोतराचा सोगा सांभाळणाऱ्यानेच निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसून येते. तुळजापूर मतदारसंघावर गेल्या वीस वर्षांपासून आमदार मधुकरराव चव्हाण यांचं वर्चस्व आहे. विरोधकांत झालेल्या मत विभागणीमुळं आमदार चव्हाण यांना विजय मिळतो असं आजवरचं चित्र आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

यंदा मात्र भाजपा-सेनेने त्यांच्या विरुद्ध सक्षमपणे लढा देण्याचं ठरवलं. उस्मानाबाद जिल्ह्याला मिळणारे २१ टीएमसी पाणी, बंद पडलेले साखर कारखाने, सुनसान औदयोगिक वसाहती आणि त्यांचा न झालेला विकास,राजकीय नेत्यांनी व सम्राटांनी लुटलेल्या सहकारी संस्था,शैक्षणिक व वैद्यकीय असुविधा,सततचा कायम दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारी हे इथले ज्वलंत प्रश्न आहेत..शिक्षण असो की वैद्यकीय सुविधा लोकांना शेजारी असलेल्या लातूर सोलापूर व पुणे या जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते.

राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिह पाटील हे भाजपत आले. उस्मानाबादमधून भाजपच्या वतीने ते निवडणूक लढवताय. त्यामुळे परत एकदा या मतदारसंघातुन शंकरराव चव्हाण निवडणुन येत इतिहास रचतात की जगजितसिंह पाटिल बाजी मारतात. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास तुळजापूर विधानसभेचा ‘आमदार’व ‘धोतर’ यांचे अतूट

Similar News