कोपरी पाचपाखाडी विधानसभा लढत

Update: 2019-10-19 16:50 GMT

विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी आता अणखीणच रंगतदार होत आहे. त्यात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्ज माघारीच्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे या मतदार संघात 11 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ठाण्यातला कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ हा बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे. 2009 साली हा मतदारसंघ ठाणे शहर मतदारसंघातून वेगळा झाला.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

तेव्हापासून एकनाथ शिंदेच इथले आमदार आहेत.2014 ला मोदी लाट असतानाही एकनाथ शिंदे इथे एक लाख मतांनी इथून निवडून आले. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे असं समीकरणच बनलं आहे. एकनाथ शिंदे राज्यातले मोठे नेते असले तरी इथे गेल्या पाच वर्षांत एकही मोठा प्रकल्प झालेला नाही. अनेक जुन्या, धोकादायक आणि अनधिकृत इमारती इथे आहेत. इथे असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सॅटिस दोन हा प्रकल्प इथे राबवला जाणार आहे. त्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकतात. शहरात पाणी योजना, ठाणे पूर्वेला स्काय वॉक, जॉगिंग पार्क , सचिन तेंदुलकर मिनी स्टेडीयम अशी अनेक विकासकामे केल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. तर आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक महत्वाच्या योजना मार्गी लावता आल्या नाहीत, असा आरोपही शिंदे यांनी केलाय. कोपरी पाचपाखाडी या मतदार संघात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा आहे. त्यांना आवाहन देण्यासाठी कॉग्रेसकडून संजय घडीगांवकर यांच्यासह मनसेचे महेश कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे उन्मेश बागवे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

Similar News