राज्यात कोरोनाचे 20 हजार 295 रुग्ण, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Update: 2021-05-29 16:32 GMT

आज राज्यात २० हजार २९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.४६% एवढे झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा कमी होताना दिसत नाही. आज राज्यात ४४३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,१३,२१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २,७६,५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे .


Tags:    

Similar News