राज्यात कोरोना रुग्णांची वाढ थांबली, मृत्यूंचा आकडा चिंताजनक

Update: 2021-05-22 18:23 GMT

आज राज्यात कोरोनाचे ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज २६,१३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ही आकडेवारी दिलासादायक असली तरी राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. आज राज्यात आज ६८२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

आत्ता पर्यंत राज्यात एकूण ५१,११,०९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०४% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ३,५२,२४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.



Tags:    

Similar News