राज्यात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी, मृत्युचा आकडा चिंताजनक

Update: 2021-05-11 16:34 GMT

आज राज्यात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी राज्यात आज मृत्यमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आज राज्यात ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आज ४०,९५६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.६७% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

Tags:    

Similar News