मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला विधान परिषद सदस्यत्वासाठी अर्ज

Update: 2020-05-11 07:37 GMT

विधान परिषद निवडणुकिसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. काही वेळापूर्वी विधानभवनात त्यांनी हा अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसने २ उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नाही असं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यस्तीनंतर काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतला आणि ही निवडणूक आता बिनविरोध होत आहे.

निवडणूक होत असलेल्या ९ जागांपैकी महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Similar News