साताऱ्यातील मोदींच्या सभेचा सामान्यांना मनस्थाप

Update: 2019-10-18 04:17 GMT

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सातारा येथे सभा घेतली. मात्र, मोदींच्या या सभेचा सातारा येथील सभेचा सर्व सामान्य लोकांबरोबरच अधिकाऱ्यांना चांगलाच मनस्थाप सहन करावा लागला.

शहरातील सभेच्या ठिकाणचे आसपासचे पूर्ण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. या रस्त्यावरुन येताना पोलीसांनी चक्क साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना देखील अडवले. जिल्हाधिकारी आहे हे सांगुनही पोलीसांनी त्यांना रस्ता दिला नाही. त्यानंतर त्या संतापून निघुन गेल्या.

एका माध्यामांच्या पत्रकारासोबत देखील पोलीसांची बाचाबाची झाल्याची माहीती आहे. सातारकर गल्ल्या गल्यातून वाट काढत घरी परतत होते त्यामुळे सातारकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे दिसत होते. अनेक स्टाॅल देखील बंद करायला लावले होते.

शाळांच्या शीफ्ट बदलण्यात आल्या होत्या. यामुळे सातारा शहरातील वाहतुक व्यवस्थेबरोबरच मोदींच्या सभेमुळे सातारकरांचे दिवसाचे पूर्ण नियोजन कोलमडले होते. यावेळी सभेदरम्यान संभाजी भीडे पोलिस बंदोबस्तात सभेच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, त्यांची स्टेजवर दखल न घेतल्यानं मोदींचे भाषण सुरु असतानाच उठुन गेल्याचे दिसले. ते आल्याचे सर्वांनी पाहीले मात्र, त्यांना सभामंचावर बोलवले नाही. अथवा साधा उल्लेखही केला गेला नाही. म्हणून ते संतापल्याचं समजतं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2116767081951422/?t=4

Similar News