संजय राऊत यांच्या कसोटीचा दिवस

Update: 2019-11-30 04:05 GMT

गेल्या महिनाभरात वातावरण ढवळून काढणाऱ्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज शिवसेना(Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी सरकारवर बहुमताचा शिक्का बसणार आहे. त्यानिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहिली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1200595447271886848

‘हमको मिटा सके जमाने मे दम नही, जमाना हमसे है हम जमाने से नही’ अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी आपल्याला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि कॅबिनेटची बैठक घेऊन आज विधानसभा अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. आज दुपारी दोन वाजता विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिवसेना सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार सोबत आहेत.

मात्र, अजित पवार (Ajit Pawar) गटाबाबत अजुनही धाकधुक कायम आहे. त्यामुळे काही आमदार कुंपणावर आहेत. याचा निकाल आज स्पष्ट होईल. संजय राऊत यांच्या आयुष्यातील आजचा क्षण सर्वात मोठा असणार आहे. तीन पक्षाचे सरकार आल आहे. पण त्यावर आज बहुमताची मोहर लागणार आहे.

मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची घोषणा झाल्यावर संजय राऊत यांनी आता माझं काम संपलं अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं आणि या सर्वातून बाहेर पडत आहे असा संदेश दिला होता.

हे ही वाचा...

विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक

विकासदर ४.५ टक्क्यांवर; गत सहा वर्षातील सर्वात निचांकी दर

नव्या सरकारचा जल्लोष करणाऱ्या मराठी भाषिकांवर बेळगावात पोलिसांची दडपशाही

आता मी पत्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. शिवसेना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस या विचारधारेच्या पक्षांना एक एकत्र करण्यासाठी राऊत यांना मोठी कसरत करावी लागली. अनेकांना ही समीकरण जुळणार नाही असं वाटत होत असतानाच राऊत यांना मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र येतील असा विश्वास होता.

राऊत यांनी ही खिंड एकट्याने लढवली. त्यामुळे संजय राऊत शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना अंगावर घेतलं आणि रोखठोक उत्तरं दिली. संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आज विधानसभेच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध झालं की, संजय राऊत यांचं काम झालं असंच म्हणावं लागेल.

Similar News