लातुरमध्ये धिरज देशमुख आणि नोटामध्ये जोरदार टक्कर

Update: 2019-10-25 06:11 GMT

कदाचीत देशात पहील्यांदा अशाप्रकारचं समीकरण बनलं असेल, कोण्या उमेदवाराला चक्क नोटानी टक्कर दिली. लातुर ग्रामीण मतदारसंघातुन धिरज भोसले यांच्या विरोधात तीन उमेदवार होते. शिवसेनेचे सचिन देशमुख, वंचीतचे उमेदवार बळीराम डोने, आणि तीसरा उमेदवार नोटा.

मोठ्या प्रमाणात मताधीक्य मिळावं म्हणुन तीनही पक्षानी आपला प्रचार प्रसार केला आणि शेवटी या मतदारसंघातुन बाजी मारली धिरज देशमुख यांनी, पंरतु देशमुखांना जोरदार टक्कर दिली नोटानं, या मतदारसंघातुन सर्वात जास्त मताधीक्य मिळालं धिरज देशमुख यांना १ लाख ३१ हजार ३२१, नोटा २६,८९९ एवढी मतं मिळाली. या निवडणुकीत नोटाला एवढी मतं का मिळाली? या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे.

Similar News