Landslide: घिरट्या घालणाऱ्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून शेतीचं नुकसान कसं कळणार?

Update: 2021-08-05 15:12 GMT

कोल्हापूर: 22 जुलैच्या अगोदर 21 जुलै शेतात ऊसाचे, भाताचे पीक फुलत होते. मात्र, 22 जुलै ला पिकांना वाढवणारा फुलवणारा पाऊसच कर्दनकाळ ठरला आणि शाहूवाडी तालुक्यातील शेकडो एकर जमीन भुस्कलनाने खडक मातीच्या ढिगाऱ्याखाली आली. आता ही जमीन हाताखाली आणणे शेतकऱ्यांसाठी अशक्य आहे.

एका उखळू गावातील जवळपास 250 एकर शेत जमीन नष्ट झाली आहे. अशा अनेक गावातील शेती भुस्कलनामुळे नष्ट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय नेत्यांचे पुरपर्यटन दौरे जोरदार सुरू आहेत. पूर भागातून हेलिकॉप्टर घिरट्या घालत आहेत. या दौऱ्यांनी शेती गमावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का ? त्यांची गेलेली शेती पुन्हा त्यांना मिळणार? हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

Full View
Tags:    

Similar News