Lakhimpur Kheri: केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मुख्य आरोपी, चार्जशीट दाखल

Update: 2022-01-03 13:46 GMT

Photo courtesy : social media

लखीमपूर खेरी प्रकरणात आज SIT ने ५००० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रविवार, ३ ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूर येथे जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवली होती.

यामध्ये ४ शेतकऱ्यांसह एका पत्रकारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं असून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाच्या एसआयटी कमिटीने हा शेतकऱ्यांना मारण्याचा प्लान होता. असा अहवाल दिल्यानंतर या आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या बंदूकीतून सुटली होती गोळी…

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलांच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याची माहिती फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार हिंसाचाराच्या वेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन बंदूकीतून गोळीबार झाल्याचे पुरावे समोर आले आहेत.

या प्रकरणातील दुसरा आरोपी अंकित दासच्या बंदुकीची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याच्या देखील बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कुणालाही गोळी लागल्याचं म्हटलं नसलं तरी मात्र, पोलिस तपासात पोलिसांना वाहनांवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. त्या आधारे यांच्या बंदूकी जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान या रिपोर्ट नंतर आता "लखीमपूर खेरी हिंसाचारात न्याय मिळावा म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे.'' मात्र मोदी यांनी अद्यापर्यंत टेनी यांचा राजीनामा घेतलेला नाही.


Full View

Tags:    

Similar News