कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण | दुसऱ्या दिवशी नोंदवली रोहित कहालेकरची साक्ष

Update: 2019-11-28 15:06 GMT

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात राज्य शासनाने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगात माजी सरन्यायधीश जयनारायण पटेल, माजी न्यायाधीश आणि कोरेगाव भीमा आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांचा समावेश आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगामार्फत साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

हे ही वाचा...

काय आहे महाविकास आघाडीचा ‘कॉंमन मिनिमम प्रोग्राम’?

महाराष्ट्रातला ‘वहिणीराज’

आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली, अशोक चव्हाण मंत्री पदाला मुकणार?

साक्ष नोंदवण्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित कहालेखर याची साक्ष घेण्यात आली. रोहित यांची भारीप महासंघाचे तालुका आयटी प्रमुख अशी कागदोपत्री नोंद होती. परंतु रोहीत कहालेखर याला यासंबधी काही माहित नसल्याचा दावा केला. रोहीत हा ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेत गेला होता. त्यावेळी त्याने सोशल मिडीयावर काही फोटो अपलोड केले होते.

सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्ट राजकीय फायद्यासाठी होत्या का? या प्रश्नावर रोहीतने कोणत्याही राजकीय फायद्यासाठी मी या पोस्ट टाकल्या नसल्याचं सांगितलं. शौर्य स्तंभाचं दर्शन घेतलं त्यावेळी तिथं गर्दी होती. तेव्हा त्याठिकाणी सर्वकाही सुरळीत होतं असंही त्याने नमूद केलं.

Similar News