#BhimaKoregaon वढू बुद्रुकमधील वादग्रस्त समाधी कोणाची? चौकशी आयोगापुढे साक्षीदारांची उलटतपासणी

Update: 2021-10-19 08:03 GMT

महाराष्ट्रात दंगल उसळवणाऱ्या भीमा- कोरेगाव प्रकरणातील कळीचा मुद्दा असलेल्या वढू बुद्रुकमधील समाधीवरुन आता चौकशी आयोगापुढे उलटतपासणी सुरु झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वतीनं समाधी आमच्याच वंशजाची असल्याचा दावा चौकशी आयोगापुढे केला आहे.

वढू बुद्रुक गावातील मराठा समाजाच्या वतीनं संभाजी शिवले (वय ५१) यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. कोरेगाव भिमापासून चार किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. गावात अजून एक समाधी असून स्थानिक दलित समाजाकडून ही समाधी १७ व्या शतकातील त्यांचे वंशज गोविंद गोपाळ देघोडी मेघोजी यांची असल्याचे सांगितले जाते.


त्याउलट मराठा समाजाकडून त्यांचे वंशज शिवले देशमुख यांनी औरंगजेबाचे आदेश फेटाळून लावत १६८९ मधे संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले होते असा दावा आहे. त्यावरुन गायकवाड कुटुंबाकडून या इतिहासाचा बोर्ड लावला होता. 28,29 डिसेंबर २०१७ रोजी मराठा समाजाकडून या बोर्ड काढण्यात आला. या वादातूनच १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली, त्यामधे एकजण मृत्युमुखी पडला तर अनेकजण जखमी झाले होते.

संभाजी शिवले यांनी चौकशी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करत वढू बुद्रुकमधील वादग्रस्त समाधीची जागा गोविंद गोपाल देघोजी मेगोजी यांची नसून गोविंद गोपाळ गायकवाड कुटुंबाचे वंशज नसल्याचे सांगतिले आहे. शिवले हे गावातील ५१ वर्षीय शिक्षक असून मिलिंद एकबोटे प्रणित छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीशी संबधीत आहेत. एकबोटे भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी असून गोविंद गोपाल यांच्या इतिहासाबद्दल वाद निर्माण करुन दंगल घडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आयोगाच्या समोर शिवलेंची उलटतपासणी करण्यात आली. वकिल किरण चन्ने यांनी गोविंद गोपाळ महार समाजाचे असल्यानेच संभाजी महाराजांचा अत्यविधी केल्याचे नाकारले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवले यांनी हा आरोप नाकारला आहे.

निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी त्यांच्या पुस्तकात संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार गोविंद गोपाळ यांनी केल्याचे निदर्शनास आणुन देताच शिवले यांनी पुस्तकात असा उल्लेख नसल्याचे सांगितले. पुस्तकात गोविंद नाक यांचा उल्लेख आहे. हे पुस्तक इतिहास संशोधन नसून कांदबरी आहे असे शिवलेंनी सांगितले.पुस्तकात दामाजी पाटील हे संभाजी महाराजांच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थित होते हा पुणे अर्काइवचा संदर्भ देखील चुकीचा असल्याचे शिवलेंनी आयोगापुढे सांगितले.

Tags:    

Similar News