बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सापडलेले 53 कोटी कोणाचे? किरीट सोमय्या बुलडाणा दौऱ्यावर

Update: 2021-11-11 14:16 GMT

बुलडाणा अर्बन पतसंस्थेने काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांच्या चार साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी 27 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाच्या एका पथकाने बुलडाणा अर्बन पतसंस्थेची चौकशी केली होती.

या संदर्भात भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एक पत्र प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या आयकर विभागाने 53 हजार 72 कोटी रुपये आणि 1 हजार 200 खाते फ्रीज केले होते.

हे संपूर्ण पैसे ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी पत्राच्या माध्यमातून केला आहे. या प्रकरणी पाठपुरावा करत सोमय्या यांनी दिल्लीत जाऊन सहकार मंत्रालय, आयकर विभाग, ED अशा विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते उद्या 12 नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरात येत आहेत.

बुलडाण्यामधील बुलडाणा अर्बन च्या मुख्य शाखेत जाऊन संचालकांशी चर्चा करणार असून दुपारी 2 वाजता या प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते नांदेड ला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags:    

Similar News