Viral video clip वर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा लोकशाही न्युजने केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Update: 2023-07-18 05:13 GMT

किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने दाखवले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अखेर १४ तासानंतर किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या व्हिडिओ प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या पत्रात चौकशीची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे की, एका न्यूज चॅनलने माझी एक व्हिडिओ क्लिप दाखवली. त्यामध्ये म्हंटले आहे की, मी अनेक महिलांना परेशान केल्याचे म्हटले आहे. त्याबाबतीत माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे. परंतू मी कधीही कुठल्याही महिलेसोबत गैरव्यवहार केला नाही.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या आरोपांची चौकशी करावी.

नेमकं पत्रात काय?

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले. अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा प्रकारे अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.


Tags:    

Similar News